Travel Tips

Wednesday, 11 March 2020

500 रुपयात कोकणवास.. Kokan Honestly in Just rs 500 per day

*500 रुपयात कोकणवास*🌴

५०० रुपयात तळकोकणात निसर्गाच्या कुशीत सुंदर कौलारू घरात रहायला देता, मग तुमाला परवडतं तरी कसं ?.. काही गौडबंगाल तर नाही ना ? असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे... याचे उत्तर असे की...
(1) आम्ही केवळ पैशासाठी हे सुरू केलेले नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरात फ्लॅट मध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना निसर्गाच्या 🌴🌴 सानिध्यात चार क्षण समाधानाने माणि शांततेने जगता यावेत, स्वछ निर्मळ हवेत श्वास घेता यावा यासाठी.
(2) कोकणातले बरेचसे लोक मुंबईत नोकऱ्या करतात. त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराला गावी तसेच गोव्यात फिरायला आणायचे असते परंतू गावी पाहुणचार करायचे वांदे होतात. मग आलेल्या मित्रांना हॉटेल मध्ये तरी कसं ठेवणार? गावाचा फील नको का यायला?.. म्हणूनच आम्ही आहोत अस्सल कोकणी पाहुणचारासाठी.
(3) गोवा फिरायला आलेल्या पर्यटकांना महागड्या हॉटेल मध्ये केवळ राहण्या-जेवण्यासाठी हजारो रुपये लागतात.. म्हणूनच आम्ही अगदी स्वस्तात गोव्यापासून अगदी एक तासावरच तुमची रहायची सोय करतोय आणि अगदी स्वस्तात चवदार मालवणी जेवणाची व्यवस्थाही...
या मागचा आमचा स्वार्थ हाच आहे की गोवा फिरायला आलेले पर्यटक पृथ्वीवरचा स्वर्ग अर्थातच आपले तळकोकण पाहतील... पर्यटन वाढेल... कोकण पर्यटनाला अजून अच्छे दिन येतील...

*500 रुपयात काय मिळणार*?
1) रहायला कोकणी संस्कृतीचा परीचय देणारे सुंदर कौलारू घर.
2) आमच्या स्थानिक लोकांसमवेत चालत गावातील सुंदर बागा, भाताची शेळ, सडा, नदीचा काठ, न्हय खोल, देवराई, जंगल सफर तसेच वनभोजन करण्याचे विलक्षण अनुभव.
3) रात्रीच्या गुलाबी थंडीत शेकोटीची ऊब.
4) झोपायला अंथरुण पांघरुण आणि आंघोळीला गरम पाणी.
5) पातीचा चहा व सकाळचा नाश्ता.

आवडीप्रमाणे घरगुती रुचकर मालवणी पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण स्वस्तात दिले जाईल .
सगळयात महत्वाचे म्हणजे तुम्हाला स्वच्छंदी फिरण्यापासून आणि आनंद घेण्यापासून कोणीही रोकणार नाही .
एकदा जरुर भेट द्या... पुन्हा नक्की याल.

🙏🙏 येवा कोकण आपलाच आसा🙏🙏
पत्ता :- श्री दत्तगुरु सामंत
मु. दुतोंड, गाव - परुळे
ता - वेंगुर्ले, जिल्हा - सिंधुदूर्ग.
मो.नं.-9637081982/9869355204

*कोकणात येतास फिराक मग काळजी करू नको ! काय ?*
कुडाळ रेल्वे स्टेशन पासून पीक-अप ड्राॅप ची सोय केली जाईल.
मुंबई गोवा हायवे (कुडाळ) पासून अवघ्या 22km अंतरावर आणि नियोजित चिपी विमानतळापासून अगदी 5 मिनीटावर. परुळे दुतोंड येथे रहाण्याची व मालवणी पद्धतीने जेवणाची उत्तम सोय !!  (भारतीय बैठक)
**आता  लांबचा प्रवास अगदी कमी वेळात, परुळे तेरावळे येथे त्सुनामी आयलंडवर. या बेटावर आमच्या कडून चालत 10 मिनिटे. वॉटर स्पोर्ट्स् ची मजाच वेगळी. या ठिकाणी बनाना राईड, जेट स्की राईड, बंपर राईड, कयाक राईड, यासारख्या राईड्सची मजा घेऊ शकता.                                                                      **बोटिंग मध्ये डॉल्फिन सफर, संगम पॉइंट, भोगवे बीच, फक्त 2.5 कि.मीटर
देवबाग बीच, होडीने 1 कि.मीटर
किल्ले निवती बीच, 4 कि.मीटर
तारकर्ली बीच 8 कि.मीटर
सिंधुदुर्ग किल्ला, 12 कि.मीटर चा अनुभव घ्या.
खोल समुद्रात ऊंच फुग्यात बसून पॅरासेलींगचा आनंदच वेगळा. समुद्रातील वेगळ्या जगाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.                                                                                        **ओहटीच्या वेळी वाळूत किल्ले बनविणे. सीगल पक्षांचे पाहणे अन मालवणी डोस्याची चवच वेगळी.
**दुपारी मालवणी जेवण करून अन् सोलकडी पिऊन ढेकर देण्याची मजाच वेगळी.
**संध्याकाळी निवांत पाण्यावर कयाक राईड (रीव्हर राफ्टिंग), मावळत्या सूर्याची किरणं अंगावर घेणं. पाण्यात गळ टाकून मासेही पकडता येतात..
*मग येताय ना ?*
!!श्री समर्थ कॅटरर्स !!
संपर्क दत्तगुरु सामंत - 9637081982
सौ. अर्चना देसाई (कणकवली) 9420150709
भाऊ परुळेकर (कुडाळ) 9422374421
!! धन्यवाद !!

No comments:

Post a Comment